कांद्याचे बाजार भाव वाढत नसल्याने शेतकरी अडचणीत   

मंचर, (प्रतिनिधी) : मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना चांगला बाजार भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी कांद्याचे दर वाढतील. या आशेने शेतकरी ३ ते ४ लाख रुपये खर्च करून कांदा चाळ बांधत आहे. कांदा चाळीचा खर्च वाढला परंतु कांद्याचे बाजार भाव वाढत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.
 
शंभर फूट लांब, पाच फूट रुंद कांदा चाळ बांधण्यासाठी अंदाजे एकुण सर्व खर्च दोन लाख रुपये येत आहे.ज्या शेतकर्‍यांचे कांदा कमी आहे. ते एकेरी  कांदा चाळ बांधत आहे. तर ज्या शेतकर्‍यांचा कांदा जास्त आहे. ते दुहेरी कांदा चाळ बांधत आहेत. १ हजार कांदा पिशवी साठवणूक करण्यासाठी अंदाजे १०० फूट लांब व ५ फूट रुंद आकाराची कांदा चाळ शेतकरी बनवतात. चार ते पाच मजूर घेऊन चार-पाच दिवसात चाळ तयार होते. 
 
चार-पाच दिवसाची मजुरी ५० हजार रुपये होते. एकुण खर्च हा दोन लाखाच्या घरात जातो. काही शेतकरी डबल पाखी कांदा चाळ बनवतात तर ज्यांच्याकडे कमी स्वरूपात कांदा आहे ते सिंगल पाखी चाळ बनवतात. डबल पाखी कांदा चाळीत ट्रॅक्टर घालण्याची सोय असते. ती कांदा चाळ मोठी व प्रशस्त असते. त्याच्यात मोठ्या प्रमाणात दोन ते अडीच हजार पिशवी कांदा साठवणूक करता येऊ शकते. ती बनवण्यासाठी सर्व साहित्य, मजूरी धरून ४ ते ५ लाख रुपये खर्च येतो, अशी माहिती निरगुडसर येथील कांदा चाळ बनवणारे व्यवसायिक उदय टाव्हरे यांनी दिली.

Related Articles